Type Here to Get Search Results !

राम हुंडारे यांना सामाजिक, पर्यावरण व पत्रकारीता मधील कार्यासाठी केंब्रिज युनिव्हर्सिटी कडून मानद 'डॉक्टरेट.




पुणे (प्रतिनिधी) :- राम हुंडारे हे एक पत्रकार असून ते पत्रकारिता, पर्यावरण, सामाजिक तसेच वृक्ष संवर्धन यासाठी काम करत आहेत. 


 त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला. 

जेष्ठ पत्रकार पेन्शन योजना, आरोग्य योजना, विमा योजना, घरकुल योजना, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास, चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळावी अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी शासन दरबारात आंदोलन, निवेदन व आपल्या पोर्टल व न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. 

त्याबरोबरच राम हुंडारे हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. इको नेचर क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक ठिकाणी वृक्षारोपण करणे व वृक्षसंवर्धन, प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे अशी अनेक कामे करत आहेत. 


त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक, पर्यावरण व पत्रकारेतर कार्याची ही एक पावतीच म्हणावी लागेल.


यापुर्वी राम हुंडारे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स इन सायकॉलॉजी (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), मास्टर ऑफ आर्ट्स इन समाजशास्त्र(शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) , वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक) या विद्यापीठांच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.


यापूर्वी राम हुंडारे यांना महाराष्ट्र शासन व सोलापूर महानगरपालिका यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण, आदर्श पत्रकार, पर्यावरण मित्र, आदर्श संपादक, महाराष्ट्र समाजरत्न असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


त्यांच्या या कार्याची दखल घेत केंब्रिज युनिव्हर्सिटीने पुणे येथील हॉटेल अशोका येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना मानद 'डॉक्टरेट' देऊन गौरविण्यात आले. 

 या कार्यक्रमात शिवकुमार देवकाते चॅनेल पार्टनर आँफ केंब्रिज एडिनबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ लंडन रेखा टापरे, मदन रेनगेडे पाटील, मॅड्डी तामगावकर यांच्या उपस्थिती मध्ये राम हुंडारे यांना मानद 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल करण्यात आली. 


 या यशाबद्दल सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील सामाजिक, पर्यावरण प्रेमी पत्रकार व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करित त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.