Type Here to Get Search Results !

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची अवस्था नदी उशाला अन कोरड घशाला, लाईट नसल्याने उभी पिकं करपू लागली

 



बेगमपूर (अमर पवार ) 

भीमा नदीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पिके यापूर्वीच करपू लागले आहेत आता पाणी येऊन सुद्धा महावितरणाने भार नियमन तीन तास केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मोटार चालू करेपर्यंत व पाणी शेतामध्ये येईपर्यंत लाईट घालवली जाते. आज देशाचा कणा शेतकरी राजा असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना वेळेवरती लाईट पाणी मिळत नसेल तर लोकप्रतिनिधींची नुसते मतदाना पुरतीच शेतकऱ्यांच्या नावावरती पोपटपंची चालते का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून सध्या भर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या शेतकऱ्यांना वाली कोणी उरलेला नाही असे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी तीव्र नाराजी दिसत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी सहा ते सात तास तरी वीज पुरवठा चालू करण्यात यावा असे शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.