Type Here to Get Search Results !

सिनेस्टाईल पाठलाग करत माचणूरजवळ चार किलो गांजा जप्त; तरुणाला अटक एक लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी ) ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने माचणूर (ता. मंगळवेढा) येथे सिनेस्टाईल कारवाई करत चार किलो १२८ ग्रॅम गांजा बाळगलेल्या युवकाला अटक केली. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाईल व सॅक असा एकूण एक लाख २७ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शाहू आली धावड (रा. ब्रह्मपुरी ता मंगळवेढा 

जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक प्रीतम

यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी तपास पथकांना अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिस कॉन्स्टेबल राहुल देवकर यांना शाहू हा शुक्रवारी (ता. ९) आहे. माचणूर येथील उड्डाणपुलाजवळ गांजा घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माचणूर उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्यावर सापळा रचला. दुपारी तीनच्या सुमारास एक संशयित युवक दुचाकीवरून येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.


मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये चार किलो १२८ ग्रॅम गांजा आढळून आला.


या प्रकरणी शाहू धावड याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाईल आणि सॅक असा मुद्देमाल जप्त केला असून गांजा नेमका कुठून आणला होता, याचा तपास सुरू आहे.


सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर, नीलकंठ जाधवर, सलीम बागवान, वीरेश कलशेट्टी, जयवंत सादुल, राहुल दोरकर, हरीश थोरात, अन्वर आतार, सुनील पवार, बाळराजे घाडगे आणि राजेंद्र गवेकर यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.