Type Here to Get Search Results !

वैद्यकीय पेशाला काळिमा फासणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी समोर आव्हान




सोलापूर (प्रतिनिधी ) शहर लगत असलेल्या गोदुताई नवीन विडी घरकुल (कुंभारी) परिसरातील रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बरेच बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरातील कोणतीही डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीत पणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण व डिग्री बाबत अधिक चौकशी करत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत या परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षापासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कोणतेही प्रयत्न करत नसल्याची अनेक वर्षांपासून नवीन विडी घरकुल मधील नागरिकांची तक्रार असून अश्या डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरांना तालुका आरोग्य अधिकारी पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप देखील या भागातील नागरिकांनी केला आहे.

गोदूताई नवीन विडी घरकुल मधील वर्षानुवर्षे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांना आशीर्वाद कोणाचा? याचा शोध आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घ्यावा लागणार असून जिल्हा आरोग्य यंत्रणेला धाब्यावर बसवून बिनधास्त वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमोर उभे टाकले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.