सोलापूर (प्रतिनिधी ) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या
यात्रेत महिलांचे दागिने चोरणारी महिला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. तिने लहान मुलाला काखेत घेऊन नजर चुकवून महिलांच्या गळ्यातील, पर्समधील दागिने चोरले होते. दुसरीकडे पाहुण्याच्या लग्नाला आलेली महिला महिलेचे तीन लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या महिलेलाही पोलिसांनी पकडले. पोलिसांनी दोन्ही महिलांकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सोलापुरातील गड्डा यात्रेत निता काळे (वय ४५, रा. शिरापूर रोड, लोकमंगल कारखान्याजवळ, ता. मोहोळ) या महिलेने साडेनऊ ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट व सहा हजार रुपये चोरले होते. तिच्याविरुद्ध मोहोळ पोलिसांत देखील चोरीचा गुन्हा दाखल आहे. २६ एप्रिल रोजी शहर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने चोरीची कबुली देत दागिने व रोकड पोलिसांना दिली.
दुसरीकडे जवळच्या नात्यातील जलकर कुटुंबीयाच्या घरी विवाहकार्य होते. त्यासाठी एक महिला मुक्कामी आली होती. कुटुंबातील महिलेने सावधगिरी म्हणून झोपताना गळ्यातील तीन लाख रुपयांचे दागिने उशीखाली ठेवले होते. पण, त्यांच्या शेजारी झोपलेल्या नात्यातील महिलेने पहाटेच दागिन्यांची पर्स घेऊन स्वतःचे घर गाठले. दागिने उशीखाली न दिसल्याने जलकर यांनी त्या महिलेकडे विचारणा केली, पण तिने नकार दिला. त्यावेळी जलकर यांनी जोडभावी पेठ पोलिसांत धाव घेतली. शहर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन खाकीच्या दमात विचारपूस केली. त्यावेळी त्या महिलेने चोरीची कबुली दिली. मोनिका रोहिटे (रा. लहान थोबडे वस्ती, सोलापूर) असे त्या महिलेचे नाव आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन मछिंद्र पंडीत सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा अतिरिक्त पदभार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड वजीद पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अजिंक्य माने महिला अंमलदार सुमित्रा बारबोले निलोफर तांबोळी चालक बाळू काळे सतीश काटे यांनी पार पाडली.
