सोलापूर (प्रतिनिधी ) गुन्ह्यांचे तपासकाम, सण-उत्सव, जयंती मिरवणुकांमधील बंदोबस्ताची ड्यूटी, मंत्री, व्हीआयपी लोकांच्या दौऱ्यावेळी बंदोबस्त, अशी कामे नेहमीच पोलिसांना करावी लागतात. दसरीकडे, जेव्हा आपण आपल्या घरात सरक्षितपणे झोप घेत असतो. तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी, अंमलदार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरभर गस्त घालत असतात. सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांवर रात्रगस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूर शहरात अडीच लाखावर कुटुंब आहेत
पण शहरात १५ हजार देखील सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. आता उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून वीज पुरवठा सारखा खंडित होत आहे त्यामुळे अनेक जण घराच्या छतावर
घराबाहेरील अंगणात झोपतात आहे. त्यावेळी चोरटे डाव साधतात, पण त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपायुक्त
विजय कबाडे,उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील उपायुक्त गौहर हसन यांनी रात्रगस्तीचे वेळापत्रक बनविले आहे. त्याची प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे पोलिस ठाण्यांमधील गुन्हे प्रकटीकरण पथके देखील रात्रभर गस्त घालत असतात. प्रत्येकाकडून
प्रभावीपणे रात्रगस्त घातली जाते का, हे पाहण्यासाठी शहरातील ३०० हून अधिक ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात
आले आहेत. गस्तीवरील अधिकारी, अंमलदारांना तो क्यूआर कोड त्यांच्या मोबाईलवरून
स्कॅन करण्याचे बंधन आहे. वरिष्ठ अधिकारी देखील अचानक भेटी देऊन रात्रगस्तीची पाहणी करतात.
या क्रमांकावरून कॉल करा अन आठ मिनिटात पोलिसांची मदत मिळवा
सध्या सोलापूर शहराचे लोकसंख्या 12 लाखावर आहे शहराच्या सुरक्षेसाठी अडीच हजारापर्यंत पोलीस आहेत प्रत्येक वेळी पोलीस प्रत्येक ठिकाणी असतील अशी स्थिती नाही त्यामुळे अडचणीच्या वेळी पोलिसांची मदत मिळणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी डायल 112 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यावर कॉल आल्यास अवघ्या 7 ते 8 मिनिटात पोलिसांची मदत मिळते दरमहा सरासरी 600 हून अधिक व्यक्ती पोलिसांना संपर्क साधतात या शिवाय मॉर्निंग वॉकसाठी हजारो सोलापूरकर दररोज घराबाहेर पडतात त्यांच्या सुरक्षेसाठी देखील गुडमॉर्निंग पथके नेमली आहेत हे पोलीस साध्या वेषात लोकांमध्ये मिसळून त्यांना सुरक्षा देतात.
