सोलापूर (प्रतिनिधी) अवघ्या दोन वर्षात तीन लाख 65 हजार वाचक वर्ग निर्माण केलेल्या कार्यसम्राट न्यूज ने पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील
राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल तीन लाख 65 हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही. कार्यसम्राट न्यूज चा 2 रा वर्धापन दीनास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे
दैनिक लोकप्रधान चे संपादक आयाज शेख
दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्जा गालिब मुजावर दैनिक कर्मयोगी चे संपादक संजय पवार
शिवभोजन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल भिंगारे
पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग फारूक मटके सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक 2/5/2026 रोजी सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र या ठिकाणी सकाळी अकरा वाजता वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संपादक यशवंत पवार यांनी दिली आहे.
