सोलापूर (प्रतिनिधी )
मागील पाच वर्षांत सोलापूर शहरात चेन स्नॅचिंगच्या १४२ घटना घडल्या. दुसरीकडे घरफोडीच्या ४६० तर वाहन चोरीचे साडेतेराशे, असे चोरीचे एकूण २२५७ गुन्हे पोलिसांत दाखल झाले. त्यात एकूण सुमारे ११ कोटींचा मुद्देमाल चोरीला गेला. अनेक घरे, दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ५५ ते ६० टक्के गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून केला.
सोलापूर शहरात दोन लाख कुटुंबे असून, शहराची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक आहे. मागील पाच वर्षांत शहराचा विस्तार झाला, पण नव्याने वसलेल्या नगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. शहराच्या गावठाण भागात देखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे चोरटे अनेकदा नजर ठेवून, टार्गेटची माहिती घेऊन डाव साधतात. पोलिस घटनास्थळी पोचतात, त्यावेळी तेथे सीसीटीव्ही नाही किंवा तो बंद आहे, असे अनुभव येतात
काही दिवसांपूर्वी सोलापुरातील 'सनसिटी'तील एका घरात चोरी झाली होती, त्या ठिकाणी कॅमेरा होता पण त्यात व्हिडिओ शूटिंगच होत नव्हते. दोन दिवसांपूर्वी बाळे परिसरातील सुरवसे नगरात बंद बंगल्यात चोरी झाली, तेथे कॅमेराच
नव्हता. त्या घरासमोरील दुसऱ्या घरात कॅमेरा होता पण तो सुरू नव्हता. अशावेळी पोलिस खबऱ्यांची मदत घेतात आणि चोरट्यांना शोधून काढतात. त्यावेळी खबरेच पोलिसांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम करतात.
*सिसिटीव्ही लावणे आवश्यक*
सोलापूर शहरातील गुन्ह्यांचा विशेषतः चोरी घरपोडीचा तपास करताना घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे
दिसत नाहीत बंगला लाखांचा असतो बंगल्यातील ऐवज देखील लाखांचा असतो मात्र काही हजारांचा सिसिटीव्ही नसतो तर काही ठिकाणी असलेले सिसिटीव्ही बंद असतात किंवा त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग नसते स्वतःच्या सुरक्षेतेसाठी प्रत्येकाने सीसीटीव्ही लावणे आवश्यक
शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने.
