सोलापूर (प्रतिनिधी ) नवी पेठेतील कापड दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने वारंवार अत्याचार केले. ती गर्भवती असल्याचे समजताच त्याने गोळ्या खायला दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांनी संशयित तरुणास अटक केली आहे. सुजल नुले (वय २१, रा. सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे.
पीडिता लहान असतानाच तिची आई मृत झाली होती. कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने पीडितेचे वडील मिळेल ते काम करुन कुटुंब सांभाळतात. पीडिता नवी पेठेतील एका कापड दुकानात कामाला होती. इन्स्टाग्रामवर सुजलची पीडितेसोबत ओळख झाली होती. त्याने मोबाईल क्रमांक दिला आणि दोघेही फोनवर, इन्स्टाग्रामवर बोलू लागले. दोन-तीन महिन्यांपूर्वी सुजलने कापड दुकानाजवळून त्याच्या घरी नेले. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी 'तू मला खूप आवडतेस,, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आपण लग्न करू' असे म्हणून अत्याचार केला. त्यानंतर त्याने पाच-सहा वेळा अत्याचार केला. एक महिन्यापूर्वी कामावर असताना अचानक उलटी आली. चक्कर येऊन मळमळत होते. दुकानातील महिला सहकाऱ्यांनी पीडितेला एका खासगी दवाखान्यात नेले. १६ मार्च रोजी दिवस गेल्याचे समजले. पीडितेने त्याबद्दल सुजलला सांगितले. २ एप्रिल रोजी सुजलने घराजवळ बोलावून पाच गोळ्या दिल्या. 'गोळ्या खा म्हणजे तुला बरे वाटेल' असे सांगितले. त्यातील गोळी खाल्ल्याने रक्तस्त्राव खूप होऊ लागला पीडितिने घडलेला प्रकार आजीला सांगितला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सुजलला अटक केली सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे तपास करीत आहेत.
