सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी माळशिरस करमाळा माढा मंगळवेढा अकलूज मोहोळ सांगोला वैराग अक्कलकोट येथील दस्त नोंदणी (सह दुय्यम निबंधक) कार्यालयात गेली अनेक वर्षांपासून खाजगी झिरो कर्मचारी बेकायदेशीर रित्या काम करत असून शासकीय दप्तर कागदपत्रे हाताळणे अभिलेख कक्षात बसून कागदपत्रे शोधणे दस्त व इंडेक्स वर सही शिक्के मारणे त्याच बरोबर खरेदी विक्री व्यवहारं बाबत एजंटाना हाताशी धरून काम करत असल्याचे निदर्शनात येत असून इंडेक्स व अभिलेख कक्षातील जुने रेकॉर्ड काढण्यासाठी ज्यादा पैशाची मागणी करणे या सह अनेक नियमबाह्य कामे झिरो कर्मचारी करत आहेत या बाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी सोलापूर चे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 27/11/2025 रोजी लेखी तक्रार केली होती तब्बल चार महिने होऊन देखील सोलापूर च्या मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांना अद्याप बाहेर केलं नाही जिल्ह्यातील झिरो कर्मचाऱ्यांना दुय्यम निबंधक पाठीशी घालत असल्यामुळे झिरो कर्मचारी त्याच कार्यलयात ठाण मांडून बसले आहेत या बाबत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी सोमवार दिनांक 6/4/2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून आज आंदोलनाचा 7 वा दिवस असून ही मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी अद्याप सोलापूर जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांची कार्यालय बाहेर हाकालपट्टी न केल्याने जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी सलग 7 व्या दिवशी देखील बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील खरेदी विक्री कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी अद्याप नाही यशवंत पवार यांचे 7 व्या दिवशी देखील बेमुदत धरणे आंदोलन सुरूच
April 15, 2026
0
