Type Here to Get Search Results !

सोलापूरात तलवार घेऊन दहशत; शहर गुन्हे शाखेची तत्काळ कारवाई, सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचे नेतृत्वात तात्काळ आरोपी ताब्यात




सोलापूर (प्रतिनिधी )

सोलापूर शहरात अवैध शस्त्रांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शहर गुन्हे शाखेने तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या इसमास ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.


पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हे शाखेला अवैध शस्त्र/अग्नीशस्त्र वापरून होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाला दि. ०४ एप्रिल रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की, संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टॅण्ड क्रमांक ०२ समोर, गुरुनानक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करत आहे.


ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे संबंधित इसम हातात तलवार घेऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत व शिताफीने त्याला ताब्यात घेतले.


ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव मोहन नागनाथ पोतु (वय ३७, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) असे सांगितले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील सुमारे २ फूट लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात स.पो.नि. शंकर धायगुडे यांच्यासह अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजू वाघमारे आणि अभिजीत धायगुडे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.