Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समितीचा 10 वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा लवकरच : अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती.




सोलापूर (प्रतिनिधी ) 


गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी  ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह  राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहे  

गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकारिता बरोबर पत्रकार सुरक्षा समितीने सामाजिक बांधिलकी देखील जपत 

समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार दिला जातोय 

सन्मान पत्र सन्मान चिन्ह त्या पुरस्काराचे स्वरूप असून विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो 

ज्यात 

आदर्श  -पत्रकार 

आदर्श - समाजसेवक 

आदर्श -वकील 

आदर्श -कवी 

आदर्श - साहित्यिक 

आदर्श - माहिती अधिकार कार्यकर्ता 

आदर्श - कुटुंब प्रमुख 

आदर्श - सामाजिक संस्था 

कृषिभूषण 

आदर्श -  वैद्यकीय सेवा (डॉक्टर)

आदर्श  - शिक्षक 

आदर्श -शिक्षिका 

आदर्श -संपादक 

यशस्वी उद्योजक 

श्रमजीवी 

इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने सन्मानपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातो पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 10  वा  पुरस्कार सोहळा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती वतीने देण्यात आली आहे  यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी रशीद शेख इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.