Type Here to Get Search Results !

फौजदार चावडी पोलिसांची दमदार कामगिरी : १३ गहाळ मोबाईल शोधून मालकांना केले परत




सोलापूर ( प्रतिनिधी ) फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथील गुन्हे प्रकटीकरण (D.B.) पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत गहाळ झालेल्या एकूण १३ अॅन्ड्रॉईड मोबाईलचा शोध लावला आहे. सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे हे मोबाईल तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे हस्तगत करण्यात आले.


फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विविध तक्रारदारांकडून मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोबाईलचे कंपनी, मॉडेल आणि IMEI नंबर यांच्या आधारे तांत्रिक तपास सुरू केला.


 त्याचबरोबर गुप्त बातमीदारांच्या मदतीने सोलापूर शहरासह परजिल्हा आणि परराज्यातून हे मोबाईल शोधून काढण्यात यश आले.

तपासादरम्यान सर्व १३ मोबाईल हस्तगत करून ते संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक तक्रारदार भावुक झाले आणि त्यांनी पोलिसांचे आभार मानले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.


ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी संजय क्षीरसागर बसवेश्वर परीट शिवानंद भीमदे सुधाकर माने पंकज घाडगे शशिकांत दराडे अर्जुन गायकवाड विनोद व्हटकर अजय चव्हाण सूरज सोनवलकर आतिष पाटील तोसिफ शेख कृष्णा बडूरे रवी धेंडे नितीन मोरे विनोदकुमार पुजारी अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड यांनी समन्वय साधून ही यशस्वी कारवाई केली असून, शहरातील गुन्हे उघडकीस आणण्यात या पथकाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.