मोहोळ (अमर पवार ) तालुक्यातील वडदेगाव येथे पैशाच्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जन गंभीर जखमी झाल्याचे धक्कादायक घटना दि. 27 एप्रिल 2026 सोमवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी कामती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघा 24 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल नरसु बागल वय 31 रा. वडदेगाव यांच्या शेतातील गडी महादेव गुंड यांनी आरोपी मंगेश सुरेश डोंगरे रा.वडदेगाव यांच्याकडे पैसे मागितले होते या कारणावरून झालेल्या वाद याचा राग मनात धरून संशयित आरोपी मंगेश डोंगरे याने आपल्या साथीदार समर्थ संजय जगताप रा. बेगमपूर याला सोबत घेत वडदेगाव रस्त्यावरील कॅनॉल जवळ फिर्यादी पक्षाला गाठले.
यावेळी संशयित आरोपीने शिवीगाळ करत वाद उकरून काढला त्यातून संतप्त झालेल्या मंगेश डोंगरे याने फिर्यादीचे भाऊ दत्ता नागनाथ बागल वय 38 यांना आज तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देत धारदार चाकूने छाती व पोटावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेला दत्ता बाबत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेला समाधान महादेव जाधव वय 25 रा. इंचगाव याच्यावरही संशयित आरोपीने चाकूने हल्ला करत त्याला कमरेजवळ व डाव्या हातावर गंभीर जखमी केले. त्याच्यावर सुद्धा सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर ची कारवाई
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर डिवायएसपी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जकीकोरे पोलीस उपनिरीक्षक दीक्षित पोलीस अनुप दळवी पोलीस हवालदार भरत चौधरी व पोलीस नाईक गणेश बाबर यांच्या पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून आरोपी मंगेश डोंगरे व समर्थ जगताप या दोघाना अटक केली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जकीकोरे करत आहेत.
