Type Here to Get Search Results !

श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न. मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचा शुभारंभ




सोलापूर (प्रतिनिधी ) दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने संपन्न झाला. दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला. प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सुर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता. शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या निमीत्ताने संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

       पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. आज स्वामी पुण्यतिथी निमित्त आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन 

कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदीसह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते, त्यामुळे अक्कलकोट शहरातील रस्ते गर्दीमुळे फुलून गेले होते.

      यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजय दास, नगरसेवक अविनाश मडीखांबे, महेश हिंडोळे, खाजप्पा झंपले, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, संजय बडवे, 

शीवा जमगे, बाळासाहेब एकबोटे, दर्शन घाटगे, रमेश शिंदे सर, प्रसाद पाटील सर, अमर पाटील, अंजय फुटाणे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, श्रीनाथ महामूरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, मोहन जाधव, प्रसाद पाटील, नितीन शिंदे, गणेश दिवाणजी, किरण किरात, योगेश पवार, संजय बडवे, रवी मलवे, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, गोकुळ गवंडी, सुनील गवंडी, आदीत्य गवंडी, सुनिल पवार, बंडेराव घाटगे, लक्ष्मण घंटे, स्वामीराव मोरे, अशोक घंटे, प्रशांत गुरव, ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव इत्यादींसह देवस्थानचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी आदींसह शहरातील व परगावाचे अनेक स्वामी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.