Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकर, बसवजयंती मिरवणुकांत डीजेला बंदी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांचा आदेश: उल्लंघन केल्यास कठोर कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात निघणाऱ्या मिरवणुकांत डीजे वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी बुधवारी (ता. १५) याबाबतचा आदेश काढला आहे.


१४ एप्रिलपासून शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला सुरुवात झाली असून रविवारी (ता. १९) मिरवणुका काढण्यात येणार आहेत. २० एप्रिल रोजी बसवजयंती असून त्यानिमित्त मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर डीजे सिस्टिमचा मोठ्या आवाजात वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने १७ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत रात्री बारापर्यंत आयोजित मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम तसेच कोणत्याही व्यक्ती अथवा


आयोजकांच्या कार्यक्रमात डीजेचा निर्णय करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा मोठ्या आवाजमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम 

होऊन कानाचे विकार, छातीचे त्रास तसेच इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


यापूर्वीही मिरवणुकांमध्ये डीजेमुळे त्रास व अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशानुसार, कोणत्याही मिरवणुकीत किंवा

सार्वजनिक कार्यक्रमात डीजेचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय न्याय


संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार कारवाई करण्यात येईल, इशारा पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.