Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्हा कारागृह येथे महिला बंदयांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 



सोलापूर (प्रतिनिधी ) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष कारागृह महानिरीक्षक (मुख्यालय) योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) सुनिल ढमाळ यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये महिला बंदयांच्या कलागुणांना वाव मिळावा व रिकाम्या वेळेचा सदुपयोग व्हावा, या उददेशाने रोटरी क्लब ऑफ सोलापूर व इनरवील क्लब, सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने महिला बंदयांसाठी एक अत्त्याधुनिक शिलाई मशीन भेट देण्यात आली. तसेच स्त्रियांचे आजार व त्यावरील उपाय यावर स्त्रीरोग तज्ञ श्रीमती धनश्री केळकर यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाकरीता कारागृह अधीक्षक सुशिल कुंभार, वरिष्ठ तुरूंगाधिकारी बिरू खळवुटे, तुरूंगाधिकारी विठठल शिंदे, शिक्षक अंगद गव्हाणे, श्रीमती सोनिया चंकेश्वरा, ज्योस्त्ना दुरुल, किर्ती गोडवलकर, संध्या इंच्या तसेच महिला बंदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.