Type Here to Get Search Results !

दुहेरी खून प्रकरणी दोन पुतणे जेरबंद पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांचा अचूक तपास




सोलापूर (प्रतिनिधी ) प्रॉपर्टीच्या वादातून 

 मूलबाळ नसलेल्या चुलता-चुलतीचा खून करणाऱ्या दोन पुतण्यांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. १६) अटक केली. त्यांना आज (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.


अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कृष्णा नगरातील वृद्ध दांपत्य महादेव मंचाळ व रंगम्मा महादेव मंचाळ यांचा रविवारी (ता. १५) खून झाला होता. दोघांच्या तोंडावर उशीने दाबून कोणीतरी खून केला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसून त्यामागील कारण वेगळेच असल्याचा अंदाज काढला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी माहिती मिळवली आणि सोमवारी मृताच्या पुतण्यांना अटक केली. राहुल रामचंद्र मंचाळ (वय २६) व विकास रामचंद्र मंचाळ (वय २३) अशी संशयितांची नावे आहेत. प्रॉपर्टीच्या वादातून त्यांनी खून केला असून घटनेच्या दिवशी दोघेही मृताच्या घरीच होते. पोलिस निरीक्षक श्री. खोमणे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.