Type Here to Get Search Results !

राज्यसभेच्या नूतन खासदार ज्योतीताई वाघमारे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार : पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा.



सोलापूर (प्रतिनिधी )

गेल्या नऊ वर्षांपासून सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहे.

शिंदे सेनेच्या मुलुख मैदानी तोफ प्रवक्त्या अभ्यासू पत्रकार ज्योतीताई वाघमारे राज्य सभेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळा ने सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे भेट घेऊन शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 

यावेळी राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नावर लक्ष घालून सोडवण्याची विनंती करण्यात आली आहे 

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार प्रदेश उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक अरुण सिडगिड्डी जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी इत्यादी पत्रकारांच्या शिष्ट मंडळात समावेश होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.