Type Here to Get Search Results !

मंद्रूप पोलिसांची जुगार अड्डयावर कारवाई 13 जणांवर गुन्हे, 6.66 लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी पदभार घेताच धडाकेबाज कारवाई ला केली सुरवात




सोलापूर (प्रतिनिधी) 


मंद्रूप (ता. द. सोलापूर) कायद्याचा धाक दाखवत मंद्रूप पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर लक्ष केंद्रित करत मोठी कारवाई केली आहे. अवघ्या 24 तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 13 जुगार्‍यांना रंगेहाथ पकडत तब्बल ₹6,66,920/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 

 टाकळी येथील कारवाईतील आरोपी (दि. 17 मार्च)

सागर दयानंद शिंदे (वय 25, रा. टाकळी)

रेवणसिद्ध सिद्धप्पा मांग (वय 22, रा. टाकळी)

सागर बालाजी मिरजे (वय 24, रा. टाकळी)

रवीकुमार हनुमंत वग्गे (वय 36, रा. टाकळी)

संतोष महादेव केरूर (वय 22, रा. टाकळी)

शिवानंद लक्ष्मण घोडके (वय 27, रा. टाकळी)

नितीन दयानंद शिंदे (वय 24, रा. टाकळी)

चाँद नबीलाल नदाफ (वय 30, रा. टाकळी)

दि. 17 मार्च रोजी टाकळी येथे शिवानंद घोडके याचे शेतातील पत्र्याच्या शेडसमोर उघड्यावर बसून “मन्ना” जुगार खेळणाऱ्या टोळीवर मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक 

शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस उपनिरीक्षक कदम,सहा.फौजदार बापू शिंदे, पो.ना.सचिन मसलखांब 

पो.कॉ.संदीप काळे,गणेश गायकवाड,बिरू पुजारी, यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत वरील 8 आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून ₹5,11,200/- किमतीच्या मोटारसायकली, मोबाईल, रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. 

  तसेच दुसऱ्या कारवाईत 

इंदिरानगर, मंद्रूप येथील कारवाईतील (दि. 16 मार्च)

तानाजी मुकुंदा मरीआई वाले (वय 33, रा. मंद्रूप)

रंगप्पा शंकर मरेईवाले (वय 34, रा. मंद्रूप)

रेवणसिद्ध सोमलिंग कांबळे (वय 35, रा. मंद्रूप)

पुतळाप्पा भीमराव कांबळे (वय 30, रा. मंद्रूप)

अशोक सिद्धप्पा कांबळे (वय 32, रा. मंद्रूप)

त्याआधीच दि. 16 मार्च रोजी इंदिरानगर, मंद्रूप येथे चिंचेच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून वरील 5 संशयित आरोपींवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ₹1,55,720/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई अतुल कुलकर्णी अधीक्षक सोलापुर ग्रामीण,मा अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पटवारी पोलीस निरीक्षक मंद्रूप पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस उपनिरीक्षक कदम,सहा.फौजदार बापू शिंदे, पो.ना.सचिन मसलखांब,

पो.कॉ.संदीप काळे,गणेश गायकवाड,बिरू पुजारी, यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.


मंद्रूप पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जुगार व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून “कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटणार नाही” असा स्पष्ट इशारा मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.