सोलापूर (प्रतिनिधी ) अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षकसोलापूर ग्रामीण .प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्या पथकातील व तालुका पोलीस ठाणे येथील कडील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना मौजे कोंडी ता.उत्तर सोलापूर येथील कॅसीनो ऑकेस्ट्रा बारमधील महिला अंगावर तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लील हावभाव करून तेथील डी.जे. एम्लीफायरच्या तालावर अश्लील नृत्य करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 17.03.2026 रोजी कॅसीनो ऑकेस्ट्रा बार येथे छापा टाकला तेंव्हा कॅसीनो ऑकेस्ट्रा बार मधील महिला अंगावर तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लिल हावभाव करून संगीताच्या तालावर अश्ल्लि नृत्य करीत असल्याचे दिसुन आले आहे. तेथे बसलेले ग्राहक समोरील नर्तका यांचेकडे पाहुन अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत असल्याचे आढळून आले
ऑकेस्ट्रा बार मधील 11 महिला, 9 ग्राहक ऑकेस्ट्रा बारचे मॅनेजर व मालक असे एकूण 21 आरोपी विरूध्द पोकॉ/भिमराव उत्तम खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला आहे.
कॅसीनो ऑकेस्ट्रा बार येथुन साऊंड बॉक्स, रोख रक्कम, मोटार सायकल, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 5 लाख 12 हजार 420 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असलेले सपोफौ/रामेश्वर कोडक हे करीत आहेत.
सदरची छापा कारवाई .अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे कडील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांनी बजावली आहे.
