Type Here to Get Search Results !

सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनकडुन डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीस अटक




सोलापूर (प्रतिनिधी ) सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथील तक्रारदार यांना दि.28/07/2025 रोजी सांयकाळी 04.00 वाजता घरी असताना फसवणुकदाराने अनोळखी मोबाईलवरुन तक्रारदार यांना संपर्क साधुन मी टेलीकॉम डिपार्टमेंट मधून टेलिकॉम ऑफिसर बोलत आहे असे सांगुन, तुमचा मोबाईल क्रमांकाचा मिसयुज झालेला असून, तुमच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशन मुबई येथे गुन्हा दाखल झाला आहे व सदर गुन्हयाचा तपास कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथील पोलीस सब इन्स्पेक्टर विजय खन्ना हे करीत आहेत असे सांगुन, पुन्हा तक्रारदार यांना अनोळखी मो. क्र. +917207888598 यावरून वॉटसअप कॉल करुन मी विजय खन्ना सब इन्स्पेक्टर कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथुन बोलत आहे असे सांगुन, तक्रारदार यांचे कौटुंबिक माहिती घेवून कुलाबा पोलीस स्टेशन येथे एक मनी लौडरींगचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सीबीआय ऑफिसर प्रविण सुद हे करीत आहेत असे सांगितले व फोन ठेवला. पुन्हा दुसऱ्या अनोळखी वॉटसअॅप क्र. +919146979289 यावरून कॉल करुन, तक्रारदार यांचे नावे असलेले एक डुप्लीकेट आधारकार्डची फोटो कॉपी व तक्रारदार यांचे नावे असलेले केनरा बँकेचे एटीएम कार्डची फोटी कॉपी पाठवून, तुमचे हे आधारकार्ड व एटीएमकार्ड कुलाबा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मनी लौडरींग गुन्ह्यातील आरोपी नरेश गोयल याच्या घरामध्ये सापडले आहे. नरेश गोयल यास अटक केली असून तपासामध्ये आपल्या नावे असलेल्या कॅनरा बँक खात्यामध्ये मोठया प्रमाणात संशयास्पद आर्थिक उलाढाल झाली असून सदर प्रकरणामध्ये आपला ही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असे सांगितले व तक्रारदार यांचे नावाने अरेस्ट बौरट, सुप्रिम कोर्टाची नोटीस सव्हॅलन्सचे ३ पानी इंग्रजी मध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटसअॅपवर पाठवून भिती घालुन तक्रारदार यांना एकूण 21,25,161/- रु इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात विभागणी करुन पाठविण्यास सांगुन त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केलेबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३१९ (२),२०४.३५१ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे दि.०४/१२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता 


सदर गुन्हा दाखल झालेनंतर सायबर एक्स्पर्ट टिमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याव्दारे दिल्ली येथुन आरोपी राघवेंद्र सिंग पिता मुलचंद वय-38 वर्षे राह-प्लॉट नं. 336, ग्राऊंड फ्लोअर गल्ली नं.02, हायटेंशन रोड, कपासहेड़ा दक्षिण-पश्चिम नवी दिल्ली. यास दि. 17/03/2026 रोजी अटक केली आहे. सदर आरोपीतांकडून पोलीस कोठडीदरम्यान त्याचे एकुण ०१ साथीदार निष्पन्न केले असुन, उर्वरीत साथीदाराचा शोध घेत आहोत. सदर गुन्हयात अटक आरोपीत यांचेकडुन गुन्हयात वापरलेला मोबाईल व फसवणुक रकमेपैकी ९,५०,०००/- रु रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे व गुन्हा उघडकीस आणलेला आहे. उर्वरीत आरोपी बाबत तपास सुरु आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्रीशैल गजा पोलीस उप-निरिक्षक नागेश इंगळे, पोसई/प्रविण भोपळे, पोहेकॉ/१३८१ गंगावणे, पोहेकों/१३४८ कृष्णात जाधव, पोहेको ६०१ प्रकाश गायकवाड, पोहेकों/२०१ मच्छिद्र राठोड, पोकों/६६५ रतिकांत राजमाने यांनी पार पाडली आहे.


             नागरीकांना आवाहन


वरील प्रमाणे सोलापूर शहरातील लोकांना सोशल मिडीयाव्दारे, वॉटसअॅप कॉल, फोन कॉल करुन हिंदी /इंग्रजी भाषे मध्ये बोलून निती व समाजात बदनामी होईल अशी मिती दाखवत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडत आहेत. तसेच मनिलाँड्रीग केसमध्ये तुमचा सहभाग आहे, त्यामध्ये तुमचे बैंक खाते एटीएमकार्ड, मोबाईल सिमकार्ड वापरले गेले आहे अशी माहिती देवून तुम्हाला डिजीटल अरेस्ट ची भीती घालने अशा प्रकारच्या घटने संदर्भात कोणास कॉल अथवा सोशल मिडीयावरुन व्हीडीओ कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद न देता सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय, तिसरा मजला, सोलापूर शहर किंवा जवळच्या पोलीस ठाणे येथे तक्रार तसेच नॅशनल सायबर क्राईम पोर्टल टोल फ्रि क्रमांक १९३० वर मोबाईलवरुन संपर्क साधुन तक्रार दाखल करावी असे तमाम नागरिकांना सोलापूर शहर पोलीसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.