Type Here to Get Search Results !

संघर्ष यात्री अप्पासाहेब लंगोटे यांना "आदर्श समाजसेवक पुरस्कार"

 



  सोलापूर (प्रतिनिधी ) ब्रिलियंट ग्रुपच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.


 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचे डिन डॉ. ऋत्विक जयकर हे होते. 


कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचे डिन डॉ.ऋत्विक जयकर, प्राध्यापक भोजराज पवार सर, डॉ.विठ्ठल धडके प्राध्यापक सिव्हिल हॉस्पिटल, सौ मया सिद्धे महिला गृह उद्योग, सौ मीना गायकवाड सेवानिवृत्त प्राध्यापक , ब्रिलियंट ग्रुप अध्यक्षा कु. प्रणाली रासे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


यावेळी तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे यांना त्यांच्या समाजातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "आदर्श समाजसेवक पुरस्कार " देवुन गौरव करण्यात आला. त्यांना डॉ. ऋत्विक जयकर यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह रोप व गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला. 


यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


या प्रसंगी ब्रिलियंट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर यांचा अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार कडून त्यांचा शाल, हार व मानाची टोपी घालून सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाला सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, दै. लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, गिरमल्ला गुरव, नितीन करजोळे, BS तांबोळी, महेश जाधव, सिध्दु पुजारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व सामाजिक व्यक्तिमत्त्वांची उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.