Type Here to Get Search Results !

मंद्रूप हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणार तक्रारदारांना न्याय देऊ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांची कार्यसम्राट न्यूजशी खास बातचीत

 



सोलापूर (प्रतिनिधी ) मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत .येथील सण, उत्सव आगामी काळातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.तक्रारदारांना योग्य न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिली. ते कार्यसम्राट न्यूज शी बोलत होते ते पुढे म्हणाले की 

मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील ३८ गावात येणाऱ्या काळामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये तसेच हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील शाळा महाविद्यालय परिसरात विनाकारण धिंगाणा घालणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त करणार आहे तसेच चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी गावोगावी फिरून सरपंच व गावकऱ्यांशी संवाद गाव तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यामुळे मंद्रुप पोलिस ठाणे हद्दीतील शाळा महाविद्यालय परिसरात विनाकारण धिंगाणा घालणाऱ्या रोड रोमियोंमध्ये खळबळ उडाली आहे 

मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांची सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांची नियुक्ती झाली असून शंकर पटवारी यांनी नुकताच मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. यानिमित्त कार्यसम्राट न्यूज ने त्यांची भेट घेऊन बातचीत केली तसेच कार्यसम्राट न्यूज वतीने त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या केला यावेळी कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार जिल्हा प्रतिनिधी अरुण सिडगिद्दी उपस्थित होते कार्यसम्राट न्यूज शी बोलताना पोलीस निरीक्षक शंकर पटवारी म्हणाले, मंद्रूप पोलीस स्टेशनला येणारे तक्रारदारांची तक्रार नोंदवून त्यांना योग्य ते न्याय देण्याचा पण प्रयत्न करू. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आपण प्राधान्य देणार आहोत.३८ गावात अवैध व्यवसाय आपण चालू देणार नाही. रोडरोमिओ तरूणांवर कडक कारवाई करू तसेच वेगाने दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन तसेच युवकांवर आणि त्यांच्या पालकांवर सुद्धा आपण कारवाई करणार आहोत. चोऱ्या, घरफोडी होऊ नये यासाठी रात्रीची गस्त पोलीस घालणार आहेत ग्राम सुरक्षा दल पुन्हा तैनात करण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आपण घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी  कार्यसम्राट न्यूज ला आवर्जून सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.