पुणे (प्रतिनिधी ) शहरात ज्या वाहनांवर वाहतूक नियमभंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे.
१) सदर नोटीस ही वाहन मालकांच्या नोदणीकृत मोबाईल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोड वरून SMS द्वारे पाठविण्यात येणार आहे.
२) ही नोटीस दिनांक २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ व १ मार्च २०२६ या कालावधीतच पाठविण्यात येणार आहे.
१) अधिकृत संकेतस्थळ https://mahatrafficechallan.gov.in ही आहे.
३) जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात जावुन ई-चलान मशीनवरती QR Code / Debit/Credit Card द्वारे भरा
१) वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाईल पाठविण्यात येणार नाही.
२) आपला OTP कोणालाही शेअर करू नये.
४) संशयास्पद लिंक किंवा कॉल आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
या मोहिमेचा उद्देश नागरिकांना नियमपालनासाठी प्रवृत्त करणे, प्रलंबित दंड वसुली पारदर्शक पद्धतीने करणे आणि वाहतूक शिस्त अधिक सक्षम करणे हा आहे.
तरी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील यांनी केले आहे.
