मोहोळ( अमर पवार) महाराष्ट्र भूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रविवार दिनांक 01 मार्च 2026 रोजी महास्वच्छता अभियान आयोजित केले आहे. या अभियानाची सुरुवात सकाळी 07:30 पासून 10:30 पर्यंत अभियान राबवले जाणार आहे. जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता यावी, प्रत्येक परिसर स्वच्छ राहण्याकरिता प्रशासकीय कार्यालये, वाहतूक मार्ग स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन आणि स्वच्छता अभियान, बोअर जल पुनर्भरण, असे अनेक उपक्रम देश देशामध्ये या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी राबवले जातात. गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या या कार्याची देशभरात ख्याती असून स्वयं प्रेरणा आणि सेवाभाव या हेतूने अभियान यशस्वी होते. डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि गावातील ग्रामपंचायत नागरिक व नगरपंचायत नगरपरिषद यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये सर्व संघटना व सर्व नागरिक या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
