सोलापूर (प्रतिनिधी ) अनेक दशकांपासून राजशेखर लिंबारे यांचा महसूल विभागात तलाठी ते तहसीलदार हा प्रवास अनेक अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी व संघर्षमय राहिला आहे. याच मार्गावर चालत सांगली जिल्ह्यातील आष्टा या तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवून राजशेखर लिंबारे यांनी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तहसिलदार म्हणूनही सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात चमकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा या गावच्या तरुणाची आजच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारी ही संघर्षमय यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
राजशेखर लिंबारे यांचे आई वडील आज ही शेतात मोलमजुरी करतात शेतकरी कुटुंबातील हा तरुण, गावातील सामान्य परिस्थितीतून बाहेर पडून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी होता. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्यांवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
प्रशासकीय सेवेतील अनेक पदावर त्यांनी काम केलं आहे त्यात तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि नंतर तहसीलदार या टप्प्यांमधून जात ते यशस्वी झाले
प्रशासकीय सेवेत येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आणि महसूल विभागातील प्रत्येक कामांना गती देण्यासाठी अथक प्रयत्न केले.
एका ग्रामीण भागातील अत्यंत गरिबीतून बाहेर पडून, प्रशासकीय सेवेत उच्च पद मिळवण्याची राजशेखर लिंबारे यांची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी एक आदर्श ठरली आहे.
या प्रवासात त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला त्यांच्या समोर अनेक आव्हाने होती ज्यात आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि नोकरीची अनिश्चितता. मात्र, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर राजशेखर लिंबारे यांनी सर्व अडचणींवर मात करत आदर्श अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे
त्यांच्या या संघर्ष मय यशामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात या तरुणाची चर्चा आहे आणि अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत.
सुरुवातीला ते अक्कलकोट तालुक्यातील करजगी या गावात गाव कामगार तलाठी म्हणून रुजु झाले त्यांच्या कामाची पद्धत व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या तलाठीची मंडळ अधिकारी पदावर मजल गेली तसेच ते अक्कलकोट तालुक्यातील करजगी या गावच्या पंचक्रोशीतील गावागावात त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली पंचक्रोशीत राजशेखर लिंबारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली दरम्यान राजशेखर लिंबारे यांचा दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेत तहसीलदार पदाचा पदभार मिळाला या कालावधीत त्यांनी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी,मदत करत सात वर्षे सेवा केली तो काळ कसा गेला त्यांनाही कळले नाही दरम्यान त्यांची मोहोळ तहसीलदार कार्यालयात पुन्हा बदली झाली
त्यादरम्यान अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक नागरिकांना तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या बदलीच्या निमित्ताने नाराजी व्यक्त केली त्याच काळात मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालय येथील तहसीलदार उज्वला सोरटे यांची बदली झाली त्यांच्या जागेवर राजशेखर लिंबारे यांचा वर्णी लागली त्यादरम्यान मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांची आपुलकीने आदराने विचारपूस व चौकशी करून त्यांच्या अडचणीचे निराकरण केल्याशिवाय परत पाठवत नव्हते
तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा कार्यकाळात अप्पर तहसीलदार कार्यालय परिसरात वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यांच्या जनसंपर्क मोठा होता म्हणून
गेल्या वर्षी राजशेखर लिंबारे यांचा बदली निमित्ताने आष्टा येथे रुजु झाले पण अजुनही ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या व पत्रकारांच्या मनामध्ये त्यांनी आज देखील घर केले असून त्यांच्या धडाडीच्या कामाचे आजदेखील कौतुक केले जात आहे.
