सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील (गुरुनानक चौकात ) नागरिकांच्या सोयीसाठी दीड वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयासह महिला व बाल रुग्णालय सुरु झाले. अल्पावधीतच हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरले असून, विशेषतः महिलांच्या प्रसूतीसाठी मोठी मदत होत आहे. मात्र, रुग्णालयात अद्यापही एमआरआय आणि सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्याशिवाय रक्ताच्या काही महत्वाच्या चाचण्याही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवले जात आहे. तिथे अनेकवेळा मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णांना रुग्णांना महागड्या चाचण्यांसाठी खासगी केंद्रांचा उंबरठा झिजवावा लागत आहे.
रुग्णालयात चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. मात्र, एमआरआय आणि सिटी स्कॅन यासारख्या अत्यंत महत्वाच्या सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत गंभीर आजरांच्या
निदानासाठी या चाचण्या अनिवार्य असतात. जिल्हा रुग्णालयात ही सोय नसल्याने रुग्णांना छत्रपती शिवाज महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे जावे लागते किंवा खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात या बाबत पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करून शासन स्तरावर पत्र व्यवहार करण्याची विनंती केली आहे.
*सिटीस्कॅन व एमआयआर मशीन बाबत जिल्हा नियोजन समिती कडे निधीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे ठोस आश्वासन उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिले आहे*
या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी इम्रान आत्तार गणेश निंबाळकर विकास नाथ इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
*पत्रकारिता बरोबर सामाजिक भान जपणारी पत्रकार सुरक्षा समिती*-प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर नेहमीच आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून देखील समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी देखील प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केलं असून जिल्हा रुग्णालयाच्या सिटीस्कॅन व एमआरआय मशीन बाबत राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे

