Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संघटक पदी जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिड्डी यांची नियुक्ती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांची माहिती




सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहे 

पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांची निवड पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी जाहीर केली असून लवकरच त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार होणार आहे. 

*जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिड्डी यांचा अल्प परिचय*

 अरुण सिडगिद्दी हे नवीन विडी घरकुल येथील रहिवाशी असून त्यांना लहानपणापासून पत्रकारिताची आवड व आकर्षण होते समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याच बरोबर वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे ही भूमिका असल्याने अरुण सिडगिद्दी यांनी सा. गोदूताई संदेश नावाचे वृत्तपत्र सुरु केले असून संपादक पदाची जबाबदारी अनेक वर्षांपासून ते इमानइतबारे यशस्वीरित्या पार पाडत आहेत. सोलापूर शहरातील विविध विषयावर गोदूताई संदेश व साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रातून लेखन करत असून तळागाळाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत

अरुण सिडगिड्डी यांनी यापूर्वी 

पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष शहर सचिव या पदावर काम केल असून पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रत्येक आंदोलन उपोषण निवेदन व लढाईत ते नेहमीच सहभागी असतात सर्वाना सोबत घेऊन काम करणारे म्हणून जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांची आगळी वेगळी ओळख आहे अतिशय शांत संयमी अभ्यासू असलेल्या जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.