Type Here to Get Search Results !

निवडणूक मतदानानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त.



मोहोळ (अमर पवार ) 

दि.07/02/2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 ची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 

 त्या अनुषंगाने दि.09/02/2026 रोजी मत मोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निकालाच्या कालावधीत संभाव्य विजय/उत्सव, प्रतीस्पर्धी गटातील कार्यकर्ते यांचे कडून तणाव होऊन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत मतदानानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अग्रिम गुप्त माहिती संकलन सुरू असून आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. विजयी उमेदवारांची मिरवणूक रॅली किंवा जाहीर सभांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. निवडणुकीमध्ये विजयी व पराभूत उमेदवाराचे समर्थक समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत असून मतमोजणी केंद्रावर कठोर बॅरिकेडीग, पुरेसा पोलीस बंदोबस्त व आवश्यक सुरक्षा साहित्य तैनात करण्यात आली आहे सर्व पोलीस वाहनावरील ध्वनीवर्धक ( P A सिस्टीम) सातत्याने कार्यरत ठेवण्यात येत असून जमाव नियंत्रणा साठी त्याचा वापर केला जाणार आहे. डी जे प्रेशर हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सर, किंवा अत्याधिक आवाज निर्माण करणाऱ्या वाहनावर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. विजयी उमेदवारांना डीजे ध्वनिवर्धक किंवा मिरवणुकीचा वापर न करण्याबाबत इशारा देण्यात आला असून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात येत आहेत. संवेदनशील ठिकाणी व प्रमुख चौकावर पोलीस पिकेटस उभारण्यात आले आहेत. क्षेत्रनिहाय व झोन निहाय सतत पेट्रोलिंग सुरू असून वरिष्ठ अधिकारी स्वतः संवेदनशील भागात गस्त घालत आहेत. स्थानिक बातमीदार गाव स्तरीय माहिती यंत्रणा सक्रिय करण्यात आले असून सोशल मीडिया (व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी) वर लक्ष ठेवून अफवा व चितावणी खोर संदेशावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल राज्यराखीव पोलीस दल , स्ट्राइक फोर्स व उपलब्ध सर्वसाधारण सामग्री संवेदनशील ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क व महसूल विभागांशी समन्वय ठेव पण संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. मतमोजणी निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीस परवानगी दिली जाणार नाही. याबाबत संबंधित उमेदवार यांच्यामध्ये कायदेशीर जनजागृती करण्यात येत आहे. मतदान अथवा निकालासंदर्भात जमलेल्या कोणताही जमाव तात्काळ पी ए सिस्टीम द्वारे विखुरला जाईल. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभागीय सोलापूर यांनी याद्वारे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा भंग करणाऱ्यावर कठोर व योग्य ती उचित कायदेशीर कारवाई करणे करिता सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन संपूर्ण सज्ज असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देणे करिता तत्पर असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.