Type Here to Get Search Results !

देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या बिअरशॉपी वर कारवाई नाहीच राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांचा प्रताप उघड पत्रकारांच्या तक्रारी कडे गांधारी स्टाईल दुर्लक्ष




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात अनेक शासनमान्य बिअर शॉपी असून अनेक बिअर शॉपी मध्ये नियमबाह्य बेकायदेशीर पणे देशी विदेशी मद्य विक्री केली जाते त्याच बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळी ही बिअर शॉपी सुरु असतात. या भागातील बिअरशॉपी तब्बल रात्री 12 वाजेपर्यंत बिनधास्त पणे सुरु ठेवातात ना कायदा धाब्यावर बसवून त्याच बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व नियम व अटी पायदळी तुडवत या बिअर शॉपी खुलेआम पणे सुरु असतात अगदी लोकवस्तीत देशी विदेशी मद्य कधीही कोठेही मिळत असल्याने तळीराम देखील खूष असतात हेच तळीराम बिअर शॉपी मध्ये रात्री उशीरा मद्य मिळत असल्याने दारू पिऊन धिंगाणा घालणे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे महिलांना लज्जास्पद वर्तन करणे आपसात मोठयाने बोलणे हा प्रकार नेहमीच सुरु असून या बिअरशॉपी मुळे या भागातील अनेक नागरिक त्रस्त आहेत या बाबत कार्यसम्राट न्यूज कडे अनेक तक्रारी प्राप्त झालेने कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार यांनी जुनाविडी घरकुल परिसरातील देशी विदेशी मद्य विक्री त्याच बरोबर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बिअर शॉपी चालकावर कारवाई करावी म्हणून दिनांक 27/11/2025 रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय सोलापूर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती तब्बल 1 महिना उलटून गेला तरी या बिअरशॉपी चालकावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही केवळ कार्यालयात बसून अन कागदी घोडे नाचवून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कारभार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पत्रकारांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार निरीक्षकांवर राज्य उत्पादन शुल्क च्या अधीक्षक कारवाई करणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.