प्रतिनिधी (प्रतिनिधी)
सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दीड वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयासह महिला व बाल रुग्णालय सुरु झाले. अल्पावधीतच हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरले असून, विशेषतः महिलांच्या प्रसूतीसाठी मोठी मदत होत आहे. मात्र, रुग्णालयात अद्यापही एमआरआय आणि सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्याशिवाय रक्ताच्या काही महत्वाच्या चाचण्याही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवले जात आहे. तिथे अनेकवेळा मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णांना रुग्णांना महागड्या चाचण्यांसाठी खासगी केंद्रांचा उंबरठा झिजवावा लागत आहे.
रुग्णालयात चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. मात्र, एमआरआय आणि सिटी स्कॅन यासारख्या अत्यंत महत्वाच्या सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत गंभीर आजरांच्या
निदानासाठी या चाचण्या अनिवार्य असतात. जिल्हा रुग्णालयात ही सोय नसल्याने रुग्णांना छत्रपती शिवाज महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे जावे लागते किंवा खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात.
*सिटी स्कॅन साठी जागा निश्चित करणार*
रुग्णालयात सिटीस्कॅन ची सुविधा उपलब्ध होणार आहे आरोग्य मंत्र्याकडून रुग्णालयात जागेची पाहणी करणार आलेली आहे. एमआयआरच्या सुविधासाठी तात्काळ प्रस्ताव सादर केला जाईल
डॉ वर्षा डोईफोडे
जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर
