Type Here to Get Search Results !

राजकीय नेते महापालिका अधिकारी निवडणुकीत दंग; रमाई पुतळ्याचा विसर वर्षभरापासून प्रतीक्षा, जयंतीच्या पूर्वसंध्येलाच आठवण.




सोलापूर   (प्रतिनिधी)

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची आज शनिवारी जयंती. याच दिवशी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण ठरले होते. परंतु महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचा विसर पडला आणि जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याबाबत बैठक झाली. १३ तारखेला पुण्यात साकारणाऱ्या पुतळ्याची पाहणी करण्याचे ठरले.


पुण्यात तयार झालेला पुतळा मूळ प्रतिमेनुसर नसल्याने काही बदल सुचवण्यात आले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीतराजकीय नेते, महापालिका अधिकारी दंग होते. त्यामुळे सर्वांनाच पुतळ्याचा विसर पडला. जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी आंबेडकरी अनुयायींची बैठक झाली. तीत १३ फेब्रुवारीला पुतळा पाहण्याचे ठरले. २०२५ च्या प्रारंभीला पुतळा बनवण्याचे काम पुण्यातील मूर्तीकार सुभाष आल्हाट यांना देण्यात आले. त्यांनी मे महिन्यात पहिला पुतळा बनवला. त्याची पाहणी ८ मे रोजी करण्यात आली. काही बदल सुचवण्यात आले. त्यानुसार पुतळा तयार झाला. याच दरम्यान

महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली. त्यामुळे पुतळ्याचा विषय बाजूलाच राहिला. बैठकीला अतिरिक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, महापालिका कामगार संघटनेचे नेते अशोक जानराव, अॅड. संजीव सदाफुले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.