Type Here to Get Search Results !

पोलिस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी; माळशिरसमध्ये पाहणी




सोलापूर ( प्रतिनिधी ) 

शहरातील ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला असून, लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पोलिस वसाहतीची इमारत जीर्ण झाल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर राहावे लागत होते. अनेक दिवसांपासून नव्या इमारतीची मागणी कर्मचाऱ्यांची होती.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आज माळशिरस पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसराची केली. यावेळी अकलूज विभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक विकास धांडोरे, सहा पोलिस निरीक्षक सुनील जानकर, संदीप गोसावी, पोलिस निरिक्षक स्वाती पवार उपस्थित होते.


माळशिरस शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पोलिस ठाण्याची मोठी जागा असून, या जागेत पोलिस ठाणे व पोलिसांना राहण्याची ब्रिटिशकालीन


वसाहत होती. या पोलिस ठाण्याची व वसाहतीची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्यानंतर या ठिकाणी पोलिस ठाण्यासाठी इमारत बांधण्यात आली. परंतु पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. वसाहत नसल्याने अनेक कर्मचारी शहराबाहेर राहतात. या ठिकाणी नातेपुते व माळशिरस पोलिसांच्या सोयीच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा असणारी वसाहत तयार करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांचा राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.