Type Here to Get Search Results !

राज्यकर्त्याच्या उदासीन धोरणामुळे पत्रकारांचे प्रश्न प्रलंबीत वृत्तपत्र चळवळ मोडीत काढण्याचा सरकार चा प्रयत्न -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी डागली राज्यसरकारवर तोफ.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची मोहोळ तालुका येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष सागर पवार होते 

 या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेश यशवंत पवार यांनी राज्यकर्त्याचा उदासीन धोरणामुळे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित राहिल्याचे सांगत वृत्तपत्र चळवळ राज्य सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत राज्यातील पत्रकार एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत असे आवर्जून सांगत पत्रकारांनी संघटित असणे काळाची गरज असल्याचे परखड मत यावेळी व्यक्त केलं असून राज्यातील पत्रकारांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय राज्य सरकार ला जाग येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले या बैठकिस पत्रकार सुरक्षा समितीचे 

 सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी 

मोहोळ तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका संघटक महादेव शेवाळे तालुका खजिनदार प्रवीण फराटे तालुका प्रसिद्धी प्रमुख वजीर मुलाणी तालुका सचिव शहाजी शिंदे इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.