Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज यांना " शाक्य', सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची मानवंदना




सोलापूर (प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 0396 व्या जयंतीनिमित्त रंगभवन‌ चौकजवळील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी ‌10-30 वा. ''शाक्य'' चे अध्यक्ष आयु. अंगद मुके, अशोककुमार दिलपाक, कैलास गायकवाड, मिलिंद कोरे ‌यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर छ्त्रपती शिवरायांना विशेष ड्रेस कोडमध्ये सलामी दिली.


यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 'शाक्य' संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.   


यावेळी " शाक्य', सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची 

शेखर वाघमारे, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, आनंद काळोखे, गोपीचंद वाघमारे, शशिकांत बाबरे‌, मोतीराम गडेराव, चंद्रकांत कांबळे, ईश्वर मसलखांब, यलदास वामने, शांताराम वाघमारे, संभाजी आरमार चे बहुसंख्य कार्यकर्ते, महिला मंडळ तसेच अबाल-वृद्धांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.