Type Here to Get Search Results !

लेखी तक्रार न घेताच डॉक्टर बडतर्फ चौकशीपूर्वीच कारवाईमुळे महापालिकेत खळबळ, आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर महापालिकेच्या 

एका दवाखान्यात डॉक्टरने रुग्णांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला. पीडिताकडून तक्रार आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात येईल. चौकशी अहवालावरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पीडिताची तक्रार येण्यापूर्वी डॉक्टराच्या बडतर्फीचा आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढला. या आदेशावरून प्रशासनामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.


महापालिकेच्या पूर्व भागातील बॉईज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या गैरवर्तणुकीवरून नर्सने आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी डॉक्टर आणि नर्समध्ये पटत नसल्याची यापूर्वीची तक्रार


होती. आता अश्लील वर्तनाबाबतची तोंडी तक्रार आली आहे. लेखी तक्रारीनंतर चौकशी समिती नियुक्त करणार असल्याची माहिती डॉ. राखी माने यांनी दिली. या दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करू, यासाठी संबंधित पीडितेला लेखी तक्रार देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही डॉ. राखी माने यांनी सांगितले. मात्र ना पीडितेची लेखी तक्रार, ना कोणती समिती, ना समितीची चौकशी. डॉक्टरावर थेट बडतर्फीची कारवाई केल्याने प्रशासनामधील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोग्य अधिकाऱ्यांच्या एकणूच कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.