Type Here to Get Search Results !

तळीरांमाचा उच्छाद सुरूच जेलरोड पोलीसांचे मौन, कारवाई नाहीच पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याची महिला वर्गाची मागणी

 


सोलापूर (प्रतिनिधी ) वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून शहरात राहण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेक लोक शहराबाहेरील नगरात उपनगरात राहायला जात आहेत 

अक्कलकोट रोडवर संगमेश्वर नगर मल्लिकार्जुन नगर मनिधारी सूत मील जुना विडी घरकुल यासह इतर नगरातून सोलापूर शहरात त्या भागातील महिला व नागरिक नेहमीच ये -जा करत असतात अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी समोर एक दारूचे वाईन शॉप असून त्यापुढील महापालिका गाळ्यात दारू पिण्यासाठी पाणी ग्लास व चकणा उपलब्ध करून दिला जातोय हा प्रकाश अनेक वर्षांपासून सुरु असून या कडे जेलरोड पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय या चौकात ट्राफिक सिंग्नल असल्याने वाहन चालक नागरिक व महिला या सिग्नलमुळे तेथे थांबतात वाईन शॉप समोरील गाळ्यात खुलेआम अगदी खुशाल आनंदाने मजेत तळीराम सकाळी दहावाजल्यापासून रात्री वाईन शॉप बंद होईपर्यंत दारू ढोसत असतात अगदी बिनभोबाट दारू म्हटलं की गोधळ आला आरडाओरड, भांडणे, मारामारी,हा प्रकार येणारच याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे न समजणारे सोलापूरकर कसले? या चौकातून महिलावर्ग मोठया प्रमाणात जा -ये करत असल्याने त्यात सिग्नल असल्यामुळे महिला या चौकात थांबतात समोरील गाळ्यातून येणारा दारूचा दर्फ तळीरांमाचे हातवारे टोन्ट मारणे लज्जास्पध वर्तन आता नित्याची बाब बनली आहे महिलावर्ग अगदी शरमेने मान खाली घालून या चौकातून प्रवास करतात या गाळ्यातील दारू पिण्यास ग्लास पाणी व चकणा उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायीकांना पोलीस खात्याची कसलीही भीती तर नाहीच शिवाय पोलिसांचे देखील नेहमी प्रमाणे दुर्लक्ष होत असल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जेलरोड पोलीस कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न त्या महिलांना पडलेला असून या प्रकरणी आता थेट पोलीस आयुक्त यांनी लक्ष घालण्याची मागणी महिला वर्गातून केली जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.