सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालय पंढरपूर बार्शी माळशिरस अक्कलकोट करमाळा सांगोला मोहोळ अकलूज वैराग येथील दस्त नोंदणी कार्यालयातील झिरो कर्मचारी अनेक वर्षांपासून या कार्यालयात ठाण मांडून बसले असून बेकायदेशीररित्या काम करत असून शासकीय दप्तर कागदपत्रे हाताळणे अभिलेख कक्षात नियमबाह्य बसून दस्ताऐवज शोधने खरेदी विक्रीच्या कागदपत्रावर सही शिक्का मारणे इंडेक्स (सूची ) व अभिलेख कक्षातील जुने रेकॉर्ड (कागदपत्रे ) शोधून देण्यासाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांकडून अडवणूक करून ज्यादा पैशाची मागणी करणे नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडणे चुकीचे व नियमबाह्य कामे करणे असा प्रकार बिनबोभाट पणे गेली अनेक वर्षांपासून सुरु असून अश्या झिरो कर्मचाऱ्यांना सह दुय्यम निबंधक यांचा आशीर्वाद आहे या बाबत पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांची कार्यालय बाहेर हाकालपट्टी करणे बाबत पत्रकार यशवंत पवार यांनी सोलापूर चे जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे दिनांक 27/11/2025 रोजी लेखी स्वरूपाची तक्रार केली होती तब्बल तीन महिने उलटून गेले तरी जिल्हामुद्रांक अधिकारी यांनी अद्याप जाग आलेली दिसत नाही सोलापूर जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्य काम करणाऱ्या झिरो कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी तर नाहीच शिवाय तक्रार करून तीन महिने उलटून गेले तरी तक्रारदाराला साधा पत्रव्यवहार देखील मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी केलेला नाही यावरून सोलापूर जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांना नेमकं कोण पाठीशी घालतंय? असा प्रश्न निर्माण झाला असून पत्रकारांच्या तक्रारीकडे डोळेझाक करणाऱ्या जिल्हामुद्रांक अधिकाऱ्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर आता प्रश्न चिन्ह उभे राहिले असून पत्रकारांच्या तक्रारीचा विसर पडलेल्या जिल्हामुद्रांक अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निरसन कधी व कसे करणार? पत्रकार यशवंत पवार यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेर पत्रकार यशवंत पवार यांच्या हाती तेल चुना लावून बोंब मारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही कायदा राबवणारी यंत्रणाच चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर सर्वसामान्य माणसांचे काय? असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.
