Type Here to Get Search Results !

शिस्त प्रिय सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांनी स्वीकारला कामती पोलीस ठाण्याचा पदभार




बेगमपूर (अमर पवार ) कामती (बु) (ता. मोहोळ) पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक

बसवेश्वर जकीकोरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांची नुकतीच पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जकीकोरे यांनी पदभार स्वीकारला. जकीकोरे यांनी यापूर्वी नांदेड, परभणी, लातूर येथे सेवा बजावली आहे. पोलिस दलातील एक शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. कामती पोलिस ठाण्यांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामान्य नागरिक व पोलिस यांच्यातील संबंध सुसंवादाने अधिक दृढ करणार असल्याचे कामती पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक जकीकोरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.