सोलापूर (प्रतिनिधी ) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवी विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचा रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी व बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करायला हवेत त्याच बरोबर तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टर वर कारवाई करायला हवी परंतु तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे नाचवतात असा गंभीर आरोप घरकुल मधील नागरिक करत असून बोगस डॉक्टर रोखण्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना अपयश आले आहे नवीन विडी घरकुल परिसरातील वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरवर कायदेशीर कारवाई तालुका आरोग्य अधिकारी कोणता मुहूर्त पहात आहेत? अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे नवीन विडी घरकुल परिसरातील बोगस डॉक्टरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या बोगस डॉक्टरांना आहे अभय कोणाचे? असा सवाल उपस्थित केला जात असून आरोग्य विभागाची अब्रू वेशीवर टांगनाऱ्या बोगस डॉक्टरवर ना सुनवाई ना कारवाई सगळं कसं बिनभोबाट असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे
