सोलापूर (प्रतिनिधी ) उत्तर तहसील चा पदभार स्वीकारल्या पासून तहसीलदार निलेश पाटील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून अनेक वेळा लोकप्रतिनिधीनी देखील त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत तहसील उत्तर चा कारभार अनेक कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे तालुक्यातील वाळू उपसा मुरूम उपसा मंडळ अधिकारी कार्यालयातील प्रलंबित नोंदी तालुक्यातील बेकायदेशीर वीटभट्टी रॉयल्टी, माहिती अधिकार अर्जदारांना वेळेत माहिती न देणे अपील सुनावणीस वारंवार गैरहजर राहणे भ्रष्टाचारी व वादग्रस्त मंडळ अधिकारी / तलाठी यांच्या बेकायदेशीर कृती ला पाठीशी घालणे नागरिकांच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे तहसील कार्यालयात वेळेवर उपलब्ध नसणे असा प्रकार उत्तर तहसीलदार कार्यालयात नेहमीच आढळून येत आहे यातूनच मार्डी चे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व मजरेवाडी चे मंडळ अधिकारी रत्नाकर कांबळे यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नुकतेच निलंबित केले आहे मजरेवाडी चे मंडळ अधिकारी रत्नाकर कांबळे व मार्डीचे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून
त्यांना तहसीलदार निलेश पाटील नेहमीच पाठीशी घालत असून तहसीलदार निलेश पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे संजय गांधी निराधार योजनेसह इतर अनेक शासकीय योजनेपासून असंख्य नागरिक वंचित आहेत याचे गांभीर्य तहसीलदार निलेश पाटील यांना मुळीच नाही तहसीलदार निलेश पाटील यांच्या विरोधात यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस चे बळीराम काका साठे मार्डी चे ग्रामस्थ व उमेश पाटील प्रहार चे अजित कुलकर्णी व इतरांनी तक्रारी केल्या आहेत परंतु अद्याप तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर कारवाई झालेली नाही यशवंत पवार हे वृत्त पत्राचे संपादक असून
बातमीसाठी शासकीय माहितीची आवश्यकता असते त्यासाठी संपादक यशवंत पवार यांनी अनेक वेळा माहिती अधिकाराचा वापर करून देखील उत्तर च्या तहसीलदार कोणतीही माहिती देत नाहीत माहिती अधिकार कायद्याची उत्तर तहसीलदार कार्यालया कडून नेहमीच पायमल्ली होत असल्याची गंभीर बाब समोर आली असून माहिती अधिकार कायदा उत्तर च्या तहसीलदारांना लागू होत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे या ना त्या कारणाने उत्तर चे तहसीलदार नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांचे तात्काळ निलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी अशी लेखी मागणी पत्रकार यशवंत पवार यांनी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची मागणी लावून धरली आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे.

