Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरात शस्त्र वापरण्यावर निर्बंध पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांचा आदेश.

 



सोलापूर (प्रतिनिधी) विनापरवाना शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारी, दंडके, भाले, बंदुका, चाकू, काठ्या अशा इतरांना इजा होतील, अशी शस्त्रे तथा वस्तू विनापरवाना कोणालाही   

वापरता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती किंवा मृतदेहाचे प्रदर्शन नको, असे आदेश पोलिस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील यांनी काढले आहेत.


याशिवाय पाच किंवा त्याहत जास्त व्यक्ती एकाच उद्देशाने घोळका

करून थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभा, मोर्चा, आंदोलने करण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक राहील, असेही आदेशात म्हटलं आहे. अंत्ययात्रा व विवाहासाठी हा गर्दीचा नमूद निकष लागू असणार नाही, पोलीस

उपायुक्तांनी काढलेला हा आदेश २३ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.