सोलापूर (प्रतिनिधी ) पोलिस अंमलदार
सूरज अर्जुन सुरवसे व त्यांची बहीण मनीषा नवनाथ वाघमारे यांच्यावर जोडभावी पेठ पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एम. रेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांनी दोन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता केली. १६ एप्रिल २०२३ रोजी मनीषा वाघमारे या दहिटणे रोडवरील शेळगी परिसरातील सासरी होत्या.
त्यांची सासू व पती नवनाथ दत्तात्रय वाघमारे
यांनी बाळाच्या कारणातून मनीषा यांना मारहाण केली. या प्रकरणी मनीषा यांनी सासू व पतीविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने सून मनीषा व तिचा भाऊ सूरज सुरवसे यांच्याविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली आणि पोलिसांत गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे यांनी केला. सात साक्षीदार तपासले. संशयितांतर्फे अॅड. संतोष खोबरे, अॅड. एफ. क्यू. शेख, अॅड. पी. एस. आलदी यांनी काम पाहिले.
