Type Here to Get Search Results !

पोलीस असल्याची बतावणी करणारा अंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर टीम ची दमदार कारवाई





सोलापूर (प्रतिनिधी ) फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २३/१२/२०२५ रोजी दुपारी पुणे सोलापुर हायवे लगत नागोबा मंदीर जवळ दोन मोटारसायकलवरील अनोळखी इसमांनी अडवुन पोलीस असल्याची बतावणी करत हातचलाखीने फिर्यादी यांची फसवणुक करुन हातातील सोन्याच्या दोन अंगठया व गळयातील सोन्याची चैन असे ३५ ग्रॅम दागीने चोरी करुन मोटारसायकलवरुन दोन इसम हे पळुन गेले अशी माहीती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ फौजदार चावडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन फिर्यादीचे सांत्वन करुन त्यांची तक्रार दाखल करण्यात आली.. फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९४६/२०२५ भा.न्या.सं. कलम २०४.३१८ (४).३१९(२).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राउत व पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे सपोनि/क्षिरसागर व पथक यांनी तात्काळ सदर आरोपीचा शोध सुरु केला. तपासादरम्यान पथकाला मिळालेल्या माहिती नुसार सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जाफर शहाजमान इराणी रा. लोणी काळभोर, पुणे याने केला असुन त्याला त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पुणे येथुन सप्टेंबर २०२५ मध्ये ०२ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते तो सध्या परळी वैजनाथ येथील इराणी वस्ती मध्ये राहत आहे. त्याअनुषंगाने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांच्या डी. बी. पथकाने परळी वैजनाथ येथे जावुन संभाजी नगर पोलीस ठाण्याची मदत घेवुन पहाटेच्या सुमारास इराणी वस्ती मध्ये आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी हा तेथे मिळून आला नाही. सदर आरोपी जाफर हा तेथुनही पसार झाला त्यानंतर देखील पोलीसांनी सतत त्याचा तपास सुरु ठेवला त्यादरम्यान त्याचा इतर जिल्हयातील पोलीस देखील शोध घेत असलेबाबत माहीती मिळाली. त्याअनुषंगाने सदर आरोपी याचा शोध घेणे म्हणजे पोलीसांसाठी मोठे आवाहन होते. त्यातच महानगर पालिका निवडणुक आल्याने मोठया प्रमाणात बंदोबस्त देखील होता. त्यातुन सुद्धा फौजदार चावडी पोलीसांनी सतत त्याचा तपास सुरु ठेवला. दिनांक २४/१/२०२६ रोजी तपासा दरम्यान डी. बी. पथकातील पोकों/विनोद पुजारी यांना माहीती मिळाली की, सदर आरोपीत हा पुन्हा इराणी वस्ती, परळी वैजनाथ येथे आला आहे. त्यावेळी तात्काळ फौजदार चावडी डी. बी. पथक परळी वैजनाथ येथे गेले परंतु त्यास पोलीस आल्याची माहीती मिळताच तो तेथुन पळुन पुण्याचे दिशेला गेला. सदर माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व डी.वी. पथकास मिळताच पोलीसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. आरोपी लोणी काळभोर, सुपा, मोरगाव, जेजुरी, सातारा, कोल्हापुर, सावंतवाडी अशा ठिकाणी अस्तीत्व लपवत फिरत होता व त्याचे मागे फौजदार चावडीचे सपोनिरी/क्षिरसागर व पथक हे देखील वेषांतर करीत त्याचा शोध घेत फिरत होते. पोलीसांनी त्याचा लगातार ०३ दिवस व रात्र शोध घेवुन तब्बल १२०० कीलो मीटर प्रवास करुन दिनांक २७/१/२०२६ रोजी आरोपीस सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथुन भल्या पहाटे ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीकडून गुन्हयात चोरीस गेले ३५ ग्रॅम सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहेत सदर आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळला असता सदर आरोपीवर

पोलीस असल्याची बतावणी, फसवणुक, घरफोडी, जबरी चोरी, चैन स्नॅचींग असे १८ गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे आरोपीने अनेक गुन्हे करुन तो फरार असल्याची शक्यता असुन त्याबाबत इतर जिल्हयांशी संपर्क करण्यात येत आहे.

अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकाने गुन्हा घडल्यापासुन दिवस रात्र आरोपीचा शोध सुरु ठेवुन सातत्य पुर्ण तपास करुन आरोपी विरुद्ध कोणताही सुगावा नसताना सराईत आंतरराज्यीय आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले आहे


सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण व.पो.नि. महादेव राउत, पोलीस निरीक्षक श्री. तानाजी दराडे यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमूख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर पोहवा/प्रविण चुंगे पोहवा/सचिन बाबर, पोहवा/परिट, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/विनोद पुजारी, पोकों/कृष्णा बडुरे, पोकों/दिनोद व्हटकर, पोकों/अजय चव्हाण, पोकों/आतीश पाटील, पोकों/ज्ञानेश्वर गायकवाड, पोको शशीकांत दराडे, पोकों अमोल खरटमल, पोकों/सुरज सोनवलकर, पोकॉ सुधाकर माने, पोकों/नितीन मोरे, पोकों/ पंकज घाडगे, पोहवा/अयाज बागलकोटे, पोहवा/प्रकाश गायकवाड, पोहवा/मच्छींद्र राठोड, पोकों/तौसीफ शेख यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.