Type Here to Get Search Results !

पोलीस मित्र परिवार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी साप्ताहिक कार्यसम्राट चे युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची नियुक्ती.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस मित्र परिवार वतीने इतर ठिकाणाहून सोलापूर शहर जिल्ह्यात बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करणे सन्मान करणे. पोलीस अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीच्या बातम्या लावणे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्या साठी प्रयत्न करणे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शासन दरबारात प्रलंबित असलेल्या प्रश्नावर निवेदन पत्रव्यवहार करणे पोलिसांच्या सुट्ट्या रजा त्याच बरोबर पोलीस अधिकारी /कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करणे शुभेच्छा देणे चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी /अंमलदार यांचा सत्कार करणे यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी /कर्मचारी यांच्या समस्या अडचणी राज्य सरकारकडे मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे पोलिसांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा होऊन पोलीस मित्र परिवार सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष पदी साप्ताहिक कार्यसम्राट चे युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांचा पोलीस मित्र परिवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी संस्थापक यशवंत पवार शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी अमोल कुलकर्णी राजाभाऊ पवार उपस्थित होते.

युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे हे अतिशय शांत संयमी व मनमिळाऊ असून सर्वाना सोबत घेऊन काम करणारे अशी त्यांची ओळख असून समाजातील तळागाळांचे प्रश्न ते साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रा च्या माध्यमातून नेहमीच प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत असतात युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची पोलीस मित्र परिवार च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.