Type Here to Get Search Results !

उत्तर तहसील कार्यालय पुन्हा वादाचा भोवऱ्यात मार्डी चे मंडलाधिकारी सुखदेव पाटील, मजरेवाडीचे कांबळे निलंबित जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा दणका




सोलापूर (प्रतिनिधी) नोंदीतील गैरकारभाराचा ठपका ठेवत मार्डी चे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व मजरेवाडीचे मंडळ अधिकारी रत्नाकर कांबळे यांना निलंबित करण्यात आले

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा आदेश दिला निलंबित मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांची कार्यकीर्द अत्यंत वादग्रस असून नोंदीत मोठया प्रमाणात गैरप्रकार केल्याचा आरोप सातत्याने होत आहेत गतवर्षी त्यांनी अवैध वाहतुकीतून एका ट्रकचालकाला मारहाण केल्याचे ही प्रकरण समोर आले होते रत्नाकर कांबळे यांच्या बाबतीत ही गंभीर तक्रारी होत्या 

उत्तर तहसील कार्यालयात मोठया प्रमाणात गैरप्रकार होतात महसूली कामा साठी मोठया प्रमाणात नागरिकांकडून पैसे वसुल केले जातात ही गंभीर बाब वारंवार समोर आली आहे

गेल्याच महिन्यात तहसील कार्यालयातचं नायब तहसीलदार लाच घेताना रंगेहात सापडले होते या कार्यालयात कार्यरत असलेले मार्डी चे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांच्या बाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या या बाबत राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे यांनी स्वता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कारवाई चे मागणी केली होती या संदर्भात चौकशी चे आदेश देण्यात आले होते तहसीलदारांच्या अहवालात सुखदेव पाटील यांच्या कामकाजात गैर प्रकार चा ठपका ठेवण्यात आला. या अहवालावरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुखदेव पाटील यांना निलंबित केले आहे निलंबनाच्या कारवाई नंतर त्यांची खातीनिहाय चौकशी देखील होणार आहे सुखदेव पाटील यांच्या समवेत इतर ही मंडळ अधिकाऱ्यांच्या बाबतीत गंभीर आरोप आहेत मात्र अद्याप ते कारवाई च्या कक्षेबाहेर आहेत त्यांची दप्तर तपासणी कधी होणार? अशी विचारणा होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.