सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर पोलीस दलातील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे पोलीस हवालदार भागवत शिंदे यांची करीम नगर (तेलंगणा ) येथे 8 फेब्रुवारी 2026रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अशा राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे सोलापूर शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पोलीस हवालदार भागवत शिंदे यांच्या या यशा बद्दल त्यांचे पोलीस दलासह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे
