Type Here to Get Search Results !

दबंग पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या टीम ची उल्लेखनीय कामगिरी देशी बनावटी 03 पिस्टल व काडतुसेसह टोळी जेरबंद 1,71,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत




सोलापूर (प्रतिनिधी) अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक - 2026 च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात त्याकरीता जिल्हयातील अवैध शस्त्र बाळगणारे यांचेवर लक्ष ठेवुन कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सुचना दिल्या होत्या

 त्यांना गोपनिय बातमीदार मार्फत त्यांना जिल्ह्यातील अवैध अग्निषस्त्रे बाळगणारे लोकांची माहिती गोळा करत असताना मौजे परीते, ता. माढा येथील इसम विकास कैलास वजाळे रा. अण्णाभाऊ साठे नगर परिते ता. माढा याच्या कडे अवैध पिस्टल व राउंड असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विषाल वायकर यांना कार्यवाही करण्याचेआदेश देण्यात आल्याने सपोनि/विशाल वायकर व तपास पथकाने विकास कैलास वजाळे रा. अण्णाभाऊ साठे नगर परिते ता. माढा पिस्टल व राउंड घेवून एच पी पेट्रोल पंप परिते येथे विक्री साठी येणार आहे.सपोनि/विशाल वायकर व पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केले विकास कैलास वजाळे याची झडती घेतली असता कमरेला खोवलेले 1 देशी बनावटी पिस्टल मॅगझाीनसह व 1 जिवंत काडतूस मिळुन आले आरोपी अधीक तपास करता रज्जीत उर्फ गोलू रा. धुळे याचे कडुन विक्री करणे करीता 4 देशी बनावटीचे पिस्टल व राउंड आणल्याची कबुली दिली आरोपी विकास वजाळे याच्या घराची झडती घेतली असता 1 पिस्टल व 4 राउंड मिळून आले.आरोपी विकास वजाळेकडे अधिक तपास करत असता त्याने यापूर्वी अक्षय अशोक धोत्रे वय 31 रा. सुमित हॉटेलच्या पाठीमागे टेंभुर्णी तालुका माढा यास आणखी 1 देशी बनावट पिस्टल विक्री केल्याची माहिती दिली. त्यावरून 03 रे पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे. कारवाईत आतापर्यंत एकुण 03 देशी बनावट पिस्टल व 5 राउंड असा एकूण 1,71,000/- रू किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्याचेकडील चौथे पिस्टल हे राम आनंता कांबळे, रा. टेंभूर्णी यास विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाणे गुरनं 69/2026 भारतीय शस्त्र अधीनियम 1959 चे कलम 3,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/विशाल वायकर हे करीत आहे. 



 सदर गुन्ह्यात आरोपी 1) विकास कैलास वजाळे रा. अण्णाभाऊ साठे नगर परिते ता. माढा व 2) अक्षय अशोक धोत्रे वय 31 रा. सुमित हॉटेलच्या पाठीमागे टेंभुर्णी तालुका माढा यांना अटक केली असता त्यांना न्यायालयाने हजर केले असता त्यांची 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती अंजना कृष्णा व्ही. एस सहा.पोलीस अधीक्षक, करमाळा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संजय जगताप, पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक / विशाल वायकर, व पथकातील श्रेणीपोसई/श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, पोकॉ/राहुल दोरकर, हरीष थोरात, बाळासाहेब घाडगे, अन्वर अत्तार, सुनिल पवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.