Type Here to Get Search Results !

डीजे ला कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाहीच आदेशाचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त बरोबरच गुन्हे ही करणार- पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सज्जड इशारा.




सोलापूर (प्रतिनिधी) डीजेमुक्तीचा सोलापूर पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच, सोलापुरातील काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी मिरवणुकांसाठी 'एक बेस, एक टॉप' लावण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. मात्र, सर्वोच्च न्यायालय, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशांचा दाखला देत पोलिसांनी या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. कोणत्याही स्वरूपात 'डीजे'साठी परवानगी दिली जाणार नसून, आदेशाचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त करण्यात येईल आणि डीजे मालकांसह संबंधित मंडळांच्या पदाधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पूर्वी सोलापूर शहरात दरवर्षी १६० पेक्षा अधिक दिवस सार्वजनिक रस्त्यांवर डीजेच्या दणदणाटात मिरवणुका निघत असत. या प्रचंड आवाजाचा त्रास गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले तसेच रुग्णालयातील रुग्णांना सहन करावा लागत होता. अनेक भागांत मिरवणुकीच्या दिवशी नागरिक घर सोडून इतरत्र राहायला जात असल्याची उदाहरणेही समोर आली होती. एका मिरवणुकीत डीजेसमोर नाचणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा जागेवर कोसळून मृत्यू झाला होता, तर एका व्यक्तीला डीजेसमोर बसवून ठेवल्याने कायमचे बहिरेपण आले होते.

या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळ कार्यालयात ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांच्या अध्यक्षतेखाली डीजे मुक्त सोलापूर कृती समिती ची स्थापना करण्यात आली त्यानंतर शहरात मोठया प्रमाणात जनआंदोलन करण्यात आले आणी सोलापूर शहर डीजे मुक्त झाले सकाळ चा पुढाकार आणी सोलापूरकरांच्या आंदोलनाची दखल राज्याच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आलीमहाराष्ट्रात डीजे मुक्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरु असून राज्य सरकारने पोलिसांकडून माहिती ही घेतली त्यामुळे सोलापूरात डीजेमुक्ती कायम ठेवणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून सर्वच वृत्तपत्रानी डीजे विरोधात आवाज उठवला सन 2025 मध्ये दैनिक सकाळ च्या माध्यमातून डीजे मुक्त सोलापूर कृती समिती स्थापन झाली तसेच अनेक सामाजिक संघटना सरसावल्या 42 हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन ही दिले होते शहरातील डॉक्टरांनी मोर्चा काढून पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केले होते स्थानिक आमदारांनी देखील डीजे मुक्त सोलापूर ला पाठिंबा दिला होता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी डीजे व लेझर लाईटवर बंदीचे आदेश काढले त्यानुसार पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूका निघाल्या यापुढे ही डीजे ला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याच बरोबर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.